आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या नगर आणि धाराशिव जिल्ह्यातील गावांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी भेटी दिल्या. या वेळी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही देऊन विरोधकांनी अशा नैसर्गिक आपत्तीत राजकारण आणू नये, शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका, असे आवाहन त्यांनी केले.
पारनेर तालुक्यातील वनकुटे, पळशी, तास, खडकवाडी, पिंपळगाव रोठा, वडगाव दर्या, गारगुंडीसह इतर गावांमध्ये अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली.या वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना नुकसान भरपाईचे प्रचलित निकष शिथिल करून आपत्तीग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करणार आहोत असे सांगितले. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मोर्डा व धाराशिव तालुक्यातील वाडी बामणी गावांना भेट दिली. या वेळी मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, असे आश्वासन दिले. या वेळी धाराशिवचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.