आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनियमितता:शिराढोण उस्मानाबाद बस सेवा 15 दिवसांपासून बंद ; मेंटेनन्सच्या कारणामुळे सेवेत अनियमितता

शिराढोणएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब आगाराच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांची मोठी हेळसांड हेाताना दिसून येत आहे. तालुक्यातील राजकिय, व्यापारी, शैक्षणिकदृष्ट्या सर्वा मोठे गाव म्हणून शिराढोण हे गाव सर्व परिचित आहे. शिराढोण येथे महामंडळाचे मोठे बसस्थानकही अस्तित्वात आहेत. गेल्या अनेक वर्षापासून शिराढोण मार्गे धावणाऱ्या हैद्राबाद, पुणे अशा लांब पल्याच्या भरघोस उत्पन्न असणाऱ्या बससेवा तर बंद पडल्याच, परंतु जिल्हा मार्गावर धावणारी एकमेव शिराढोण मुक्कामी असणारी उस्मानाबाद गाडीही सातत्याने बंद पडत असल्याने प्रवशांची गैरसोय होत आहे. शिराढोण उस्मानाबाद गाडी सकाळी ७ वाजता उस्मानाबादला निघते व सायंकाळी ६ वाजता पुन्हा शिराढोणला जाण्यासाठी रवाना होते. शिराढोण व परिसरातील ग्रामीण भागातील प्रवशांना अतिशय सोईची असणारी ही बस सुरळीत सुरु असताना गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. त्यासोबतच कळंब आगाराच्या मुरुड मुक्कामी बससेवेबाबतही कायम अनियमिता दिसून येत आहे. शिराढोण परिसरासाठी कळंब आगाराच्या बससेवेबाबत कायमच अनास्था दिसून येते. अचानक बससेवा रद्द करण्यासाठी काय निकष असतात तसेच उत्पन्नाच्या बाबतीतही चांगल्या असणा-या बसफेऱ्या नेमक्या का रद्द होतात हा प्रश्न मात्र गुलदस्त्यातच आहे. कळंब लातूर शटल सेवा असल्याने प्रत्येक अर्ध्यातासाला लातूर जाण्यासाठी तसेच कळंब जाण्यासाठी बस असणे गरजेचे आहे. पंरतु नियोजन शुन्यता असल्याने बसस्थानकावर एकदाच दोन ते तीन बस एकाच मार्गावर धावताना दिसून येतात. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या अनियमितपणाचे कारण शोधून प्रवाशंची होणारी हेळसांड दूर करुन या बससेवेत नियोजनबध्दता आणावी तसेच पुर्ववत बससेवा सुरळीत करावी अशी अपेक्षा आहे. आता पावसाळ्यात तर बससेवेची मोठी गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...