आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजन्मोत्सव‎ सोहळा:कर्नाटक सीमेवरील उजळंब‎ गावामध्ये शिवजयंती उत्साहात‎

उमरगा‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात उजळंब येथील‎ युवक व ग्रामस्थांच्यावतीने प्रतिवर्षी विविध स्पर्धा‎ व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून शिवजन्मोत्सव‎ सोहळा उत्साहात साजरा करण्यात येत आहे.‎ शिवजन्मोत् सावानिमित्त विविध स्पर्धा,‎ सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात‎ आलेले होते. सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा‎ समिती व ग्रामस्थाच्या वतीने सोमवारी (२७)‎ मराठी राजभाषा गौरव दिन औचित्य साधून‎ शिवरायांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांचे नाट्य‎ स्वरुपात सादरीकरण आणि पोवाडे हा कार्यक्रम‎ झाला.

शिवराज्याभिषेक सोहळ्याने वातावरण‎ पूर्णतः शिवकालीन झाले होते. युवकांच्या छत्रपती‎ शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय‎ शिवराय आदी घोषणानी गाव शिवमय झाले होते.‎ कार्यक्रमास उजळंब व परिसरातील कर्नाटक व‎ महाराष्ट्र राज्यातील विविध गावांमधून शेकडो‎ शिवभक्त व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.‎ जिल्हयाच्या विविध भागात शिवजन्मात्सव‎ सोहळयानिमित्त‎ विविध कार्यक्रम झाले. यामध्ये‎ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस‎ दुगधाभिषेक, पोवाडे यासह सांस्कृतिक व‎ प्रबोधनात्मक कार्यक्रम झाले . मध्यवर्ती‎ शिवजन्माेत्सव मंडळांनी छत्रपती शिवाजी‎ महाराज यांच्या मूर्तीचे वाटप केले. हाच उत्साह‎ सीमेवरील गावामध्येही दिसून आला.‎

बातम्या आणखी आहेत...