आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, उस्मानाबाद आयोजित राज्यभिषेक सोहळा कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आतषबाजी करत मावळ्यांना पेढे भरवत, घोषणांचा जयघोष करत झाला. या वेळी तालुक्यातील हिंगळजवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. कमलताई कुंभार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
समिती अध्यक्ष राम मुंडे , यांनी सन्मान चिन्ह देऊन केले. यावेळी डॉ. प्रतापसिंह पाटील, राजसिंहा राजेनिंबाळकर, अग्निवेश शिंदे, पंकज पाटील, बलराज रणदिवे, अनंत जगताप, भालचंद्र कोकाटे, योगेश सोन्ने पाटील, अमोल पडवळ, शिवाजी चव्हाण, प्रसाद राजमाने निंबाळकर भाऊ, आकाश तावडे, कुणाल निंबाळकर, महादेव माळी, प्रमोद कोराळे, पवन सूर्यवंशी, असलम सय्यद, आनंद वीर, गणेश उंबरे, लखन देशमुख, सौरभ ढोबळे, लिंबराज डुकरे उपस्थित होते.
विद्यापीठ उपपरिसर
उस्मानाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा झाला. प्रा. रणजित दांगट यांनी शिवचरित्र व राज्याभिषेक सोहळा या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डी. के. गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास विविध विभागातील विभागप्रमुख, डॉ. प्रशांत दीक्षित, डॉ. रमेश चौगुले, डॉ. मनीषा असोरे, प्रा. जितेंद्र कुलकर्णी, डॉ. मेघश्याम पाटील, डॉ. सुयोग अमृतराव, डॉ. गोविंद कोकणे, प्राध्यापक, सहाय्यक कुलसचिव श्री भगवानराव फड, कक्ष अधिकारी श्री विद्याधर गुरव, श्री आंनदगावकर, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. विद्यार्थी कल्याण विभागाचे समन्वयक डॉ. राहुल खोब्रागडे यांनी आभार मानले.
उमरगा आदर्श महाविद्यालय
शहरातील आदर्श महाविद्यालयात सोमवार, दि. ६ रोजी शिव स्वराज्य दिन साजरा करण्यात आला त्या प्रसंगी प्राचार्य डॉ.दिलीप गरुड यांनी आपले विचार मांडले. यावेळी उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी,प्रा.डॉ. प्रभाकर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी यांनी केले. आभार प्रा.डॉ. भीमाशंकर खरोसे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.