आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्धार:ठाकरे गटाचे शिवसैनिक मेळाव्यासाठी मुंबईकडे

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या (ठाकरे गट) शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी उमरगा तालुक्यातील हजारो शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दादरच्या शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा बुधवारी दि.५ रोजी होणार आहे. या मेळाव्यासाठी उमरगा तालुक्यातील शिवसैनिक स्वखर्चाने जाणार असल्याचे अनेक शिवसैनिक सांगत होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास असून आम्ही शिवतीर्थावरच जाणार असा निर्धार त्यांनी केला आहे.

काही शिवसैनिक उस्मानाबाद , लातुर, सोलापूर या ठिकाणाहून रेल्वेने गेले आहेत. तालुक्यातून जवळपास दोन हजार शिवसैनिक शिवतीर्थावर जाणार असल्याचे तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे यांनी सांगितले. दसरा मेळाव्याला जाण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे,उमरगा तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे,माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार,विष्णु पाटील,माजी तालुका प्रमुख विजयकुमार नागणे,तालुका उपप्रमुख सुधाकर पाटील,रणधीर पवार,सिद्धाराम हत्तरगे, आप्पाराव गायकवाड,राजेंद्र कारभारी,वैजिनाथ अल्लापुरे,श्रीकांत बाबशेट्टी,वसंत करके,आदी शिवसैनिक रवाना झाले आहेत.

३५ वर्षांची परंपरा जपा
उमरगा तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांना दसरा मेळाव्याला जाण्यासाठी आवाहन करत आहे. स्वखर्चाने , घरातील डबा , भाकरी बांधून दसरा मेळाव्याला उपस्थित रहावे. मागील ३५ वर्षाची परंपरा आपण जपली पाहिजे. अठराशे शिवसैनिक मुंबईला रवाना झाले आहेत. - बाबूराव शहापुरे, तालुकाप्रमुख, शिवसेना, उमरगा

बातम्या आणखी आहेत...