आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यक्रमांचे आयोजन:शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंची तोफ धडाडणार

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या कालावधीत त्यांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत. त्यानुसार सोमवारी (दि.५) उमरगा येथे येणार असून दुपारी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतील.

त्यानंतर सायंकाळी उमरगा येथील जिल्हा परिषद, शाळेच्या प्रांगणात जाहीर महा प्रबोधन सभा होणार आहे. सभेस खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, शरद कोळी राज्य विस्तारक युवा सेना तसेच केशव ऊर्फ बाबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. रात्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला पुतळ्याला अभिवादन करतील.

बातम्या आणखी आहेत...