आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडीचे पत्र:शिवसेना जिल्हाप्रमुखपदी साळुंके

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या उस्मानाबाद जिल्हाप्रमुखपदी माजी उपनगराध्यक्ष सूरज साळुंके यांची निवड झाली. शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटासोबत जिल्ह्यातून सूरज साळुंके उभे राहिले. विद्यमान सरकारमधील आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक असलेले साळुंके यांच्यावर आता नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गुरूवारी शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आली. सचिव संजय मोरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले. यावेळी अजित लाकाळ व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी पार पाडताना जिल्ह्यात संघटन अधिक मजबूत करणार असल्याचे साळुंके यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...