आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्त्यांची बैठक:सावंतांच्या विरोधात शिवसेनेची घोषणाबाजी

उस्मानाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू गर्व गर्जना मेळाव्यासाठी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत उस्मानाबादेत कार्यकर्त्यांची बैठक घेत असताना शिवसेनेच्या (ठाकरे गट) माजी नगरसेवकांसह अनेक शिवसैनिकांनी परिसरात घोषणाबाजी केली. यावेळी तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.

माजी नगरसेवक सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, पप्पू मुंडे, रवी वाघमारे, गजेंद्र जाधव, राणा बनसोडे, वैभव वीर यांच्यासह ४० ते ५० शिवसैनिकांनी निदर्शने केली. सावंत यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र, पोलिसांना हा प्रकार समजतात सर्वांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांना थांबवून ठेवण्यात आले. कारवाईची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.