आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Aurangabad
 • Osmanabad
 • Shivaji Maharaj Temple Maharashtra | First Shivaji Maharaj Statue Bhivandi | Marathi News | The First Magnificent Temple Of Chhatrapati Shivaji In Bhiwandi; The 56 Feet High Temple Will Be Open To Devotees In Six Months

शिवरायांचे मंदिर:छत्रपती शिवरायांचे देशातील पहिले भव्य मंदिर भिवंडीत; 56 फूट उंचीचे हे मंदिर सहा महिन्यांत भाविकांसाठी होणार खुले

चंद्रसेन देशमुख | उस्मानाबाद6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • म्हैसूरमध्ये तयार होतेय महाराजांची साडेसात फुटांची उंच मूर्ती ​​​​​​​

विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिलेच भव्य आकारातील मंदिर मंुबईजवळच्या भिवंडीमध्ये साकारत आहे. एकरभर जागेत ५६ फूट उंची असलेल्या या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. ४०० वर्षे टिकेल, अशी मजबुती असलेले हे मंदिर ४ कोटी खर्चातून उभारले जात आहे. मंदिरातील गाभाऱ्यात महाराजांची भव्य साडेसात फुटांची मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. ६ महिन्यांत मंदिर शिवभक्तांसाठी खुले होणार आहे.

भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा गावात महाराजांचे हे मंदिर उभारले जात आहे. शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू चौधरी यांनी ही संकल्पना पुढे आणली आणि प्रत्यक्षात उतरवली. त्यांना शिवक्रांती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी तसेच शिवप्रेमींनी मोठी मदत केली. चौधरी यांनी या मंदिरासाठी स्वत:च्या मालकीची अडीच एकर जागा दिली आहे. ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराची उभारणी सुरू आहे. मे २०१८ मध्ये या मंदिराचे काम सुरू झाले होते.

म्हणून मंदिर उभारले
श्रीशैल्यम येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. महाराष्ट्रातही काही ठिकाणी छोट्या स्वरूपातील मंदिरे आहेत. पण भव्य मंदिर नसल्याने हे मंदिर साकारल्याचे चौधरी सांगतात.

गुरुकुलातून शिक्षण
येथे गुरुकुल उभारले जाणार आहे. त्यातील निवासी विद्यार्थ्यांना महाराजांच्या इतिहासाचे शिक्षण दिले जाईल. शिवप्रेमींनाही विद्यार्थ्यांकडून शिवरायांच्या इतिहासाबद्दल माहिती दिली जाईल.

काम पूर्ण होण्याआधीच गर्दी
मंदिराचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असले तरी गिलावा, रंगरंगोटी आदी कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र, मंदिराची माहिती मिळताच महाराष्ट्रभरातील शिवप्रेमी या मंदिराला भेटी देत आहेत.

कोरोना काळातही मंदिराचे काम
कोरोना काळातही मंदिराचे काम सुरु होते. आता काम अंतिम टप्प्यात आहे. लवकर ते पूर्ण होईल.

मंदिरापर्यंत कसे जाल?

 • मराडेपाडा (ता. भिवंडी) येथे हे मंदिर आहे. येथे जाण्यास 2 प्रमुख मार्ग.
 • पहिला मार्ग : भिवंडीवाडा ते मराडेपाडा या मार्गाने गेल्यास 3 किमी अंतरावर मंदिर आहे.
 • दुसरा मार्ग : मुंबई-नाशिक मार्गापासून वडपामार्गे 10 किमीवर लाप फाट्यापासून वळावे.
 • मुंबईपासून 60 व ठाण्यापासून 35 किमीवर हे मंदिर आहे.
 • भिंतींवर असेल महाराजांचा इतिहास सांगणारे शिल्प
 • मंदिराच्या तटबंदीच्या भिंतीवर आतून बाहेरून शिल्प बसविण्यात येत आहेत. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा

गुरुकुल व उद्यान
01 मंदिर एक एकर जागेवर. त्याभोवती दीड एकर जागेत गुरुकुल, वाहन पार्किंग, उद्यान उभारणार.

बुरुजांची रचना
04 बुरूज मंदिराभोवती. आतील भाग एखाद्या राजवाड्याप्रमाणे.

महाद्वाराची रचना
36 फूट उंचीचे महाद्वार असून, याची रचना ऐतिहासिक गडाप्रमाणे

मजबूत तटबंदी
20 फूट खोदकाम करून तटबंदीसाठी कॉलम उभारले

02 हजार पोती सिमेंटचा वापर केवळ तटबंदीसाठी केला. मंदिर नव्हे शक्तिपीठ : शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू चौधरी म्हणाले, हे केवळ मंदिर नसून शक्तिपीठ आहे.

बातम्या आणखी आहेत...