आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उमरगा शहर व तालुक्यात शिवराज्याभिषेक दिन ; राज्याभिषेक सोहळा प्रतिमेचे पूजन

उमरगा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्ययुगीन भारताच्या शेकडो वर्षाच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण अशी घटना म्हणजेच शिवराज्याभिषेक होय. रयतेच्या या जाणत्या राजास एक तात्त्विक बैठक मिळून ही फक्त अन्यायाविरुध्दची लढाई नसून सार्वभौम राज्याची स्थापना असल्याचे शिवरायांनी राज्याभिषेकाने पटवून दिले असल्याचे मत सरपंच सुनीता पावशेरे यांनी व्यक्त केले. तालुक्यात कलदेव निंबाळा येथे शिवराज्याभिषेक सोहळा ३४८ व्या सोमवारी (दि ०६) ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच सुनिता पावशेरे यांचे हस्ते शिवस्वराज्य दिनाची गुढी उभारण्यात आली. प्रारंभी राज्याभिषेक सोहळा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना सरपंच सुनिता पावशेरे यांनी आजचा हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महाविकास आघाडी राज्य सरकारचे आभार मानले. यावेळी ग्रामसेवक सुनिल पांचाळ चेअरमन तुकाराम बिराजदार, तंटामुक्त अध्यक्ष बालाजी पाटील, पोलीस पाटील पांडूरंग पाटील, कलाकार पाटील, शिवराज कल्याणकर, लक्ष्मण भालेराव, सुनिल बलसुरे, संगणक ऑपरेटर बालाजी गुरव, विठ्ठल दासमे, गहिनीनाथ बिराजदार, अरविंद दळवे, मनोहर हिरवे, नागनाथ दळवे यासह नागरिक-युवक उपस्थित होते.

नाईचाकुर येथे शिवराज्याभिषेक दिन तालुक्यातील नाईचाकुर येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात सोमवारी साजरा करण्यात आला. प्रारंभी सरपंच चंद्रकांत पवार यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करून स्वराज्य गुढी उभारण्यात आली. यावेळी केशव पवार, राम पाटील, शेषेराव पवार, शिवाजी पवार,सिध्देश्वर माने, संजय कांबळे,बजरंग कांबळे,शरद पवार,खंडू मोहिते,ग्रामविकास अधिकारी प्रभाकर नलावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोनानंतर आता परिसरात कार्यक्रम होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...