आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिवार जयजयकार:शिवराज्याभिषेक दिन जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहात ; कळंब, डोंजा,ढोकी, लोहारा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४९ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त शिवराज्याभिषेक दिन सोहळा, सोमवारी दिनांक ६ जून रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्याच्या आदेशानुसार ६ जून हा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. गंुजोटी येथे शिवराज्याभिषेक उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त सोमवार (दि.६) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अर्धकृती पुतळ्याचे पूजन करून शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील चौकास पुष्पहारांनी सजवण्यात आले होते. यावेळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन सहदेव गायकवाड, राजमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित चव्हाण यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अतुल माने, दिनेश साळुंखे, रविराज जोगदंडे, सरपंच सरस्वती कारे, उपसरपंच आयुब मुजावर, शंकरराव पाटील, शिवाजी गायकवाड, राजेंद्र गायकवाड, ग्राप सदस्य सुरेश सूर्यवंशी, जयश्रीताई कलशेट्टी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्रिकोळी येथे कार्यक्रम उमरगा तालुक्यातील त्रिकोळी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने शिवराज्याभिषेकदिन सोहळा सोमवारी दि.६ रोजी साजरा करण्यात आला . सरपंच रविंद्र हंगरगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भगवा ध्वज फडकाविण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतचे उपसरपंच दिनकर सुरवसे , सदस्य सदानंद पाटिल , प्रदिप भोसले , चेअरमन भीमराव पाटील, माजी सरपंच हरीदास सुरवसे, मोहन पाटिल, किशोर कुलकर्णी, मल्लिनाथ तुकशेट्टी, बंडोपंत मिरगाळे, शिपाई आजीम मुल्ला आदी उपस्थित होते. भाटशिरपुरा मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने भाटशिरपुरा येथे शिवराज्य अभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला.पुतळ्यास पुष्पहार पुषपहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. तद्नंतर सामूहिक जिजाऊ वंदना घेण्यात आली, आतिषबाजी, साखर वाटप करण्यात आली. या वेळी स्मारक व परिसर पाणी मारुन स्वच्छ करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत कार्यालय वर ध्वजारोहण करुन राष्ट्रगीत म्हणण्यात आले. या वेळी सरपंच सुनिता वाघमारे , संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक अतुल गायकवाड, उपसरपंच सूर्यकांत खापे, शिवराज गायकवाड, दिलीप वाघमारे, रमेश रितपुरे, सिध्देश्वर कदम,मच्छिंद्र गिरी, विकास सिरसट, बबलू चाळक, दिगंबर गायकवाड, रमेश उळगे सर,ईरफान शेख आदी उपस्थित होते. शिवगर्जना कृती समिती कळंब येथे शिवराज्याभिषेक सोहळा शिवगर्जना कृती समितीच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा तालकाध्यक्ष अजित पिंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यांनतर अश्वारुढ पुतळ्यास उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शिवगर्जना कृती समितीचे अध्यक्ष संताजी विर यांनी दुधाभिषेक केला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अतुल गायकवाड, प्रकाश धस, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष तानाजी चौधरी, मनसे महिला आघाडी च्या नेत्या वैशालीताई गायकवाड, कथले युवक आघाडीचे बाळासाहेब कथले, भाऊसाहेब शिंदे,यश सुराणा,धनंजय धाबेकर, दत्ता कवडे यांची प्रमुख उपस्थिती होती, डोंजा येथे कार्यक्रम तालुक्यातील डोंजा ग्रामपंचायतच्या वतीने भगवा ध्वज उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ही भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना मानली जाते. ६ जून १६७४ साली महाराजांनी केलेल्या विधियुक्त राज्याभिषेकाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. या राज्याभिषेकामुळे महाराजांनी स्थापन केलेल्या राज्यास कायदेशीर बैठक प्राप्त झाली. राज्यभिषेकाच्या माध्यमातून महाराजांनी जुलमी राजवटी उलथवून टाकून नवं स्वराज्य स्थापन केले. त्यांचे हे कार्य असामान्य स्वरूपाचे होते.त्याच अनुषंगाने शासनाने नविन आदेश काढून डोंजा ग्रामपंचायत येथे सकाळी भगव्या ध्वजाची गुढी उभारून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन राज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. कोरोना नियमांचे पालन करीत तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी भगवी गुढी उभारून राज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला ॲड. हरिश्चंद्र सूर्यवंशी,संभाजी सूर्यवंशी, संतोष सिरसट प्रशासकीय अधीकारी वग्गे तसेच ग्रामसेवक कुचेकर ,दत्ता हजारे,खलील मुजावर जोतिराम घोगरे आदी यांची उपस्थिती होती. ढोकी येथे उभारली शिवस्वराज्य गुढी उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे ग्रामपंचायतीवर शिवस्वराज्य गुढी उभारून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.सरपंच नाना चव्हाण यांच्या हस्ते पूजा करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले.यावेळी उपसरपंच अमोल समुद्रे, शकील काझी, शिवाजीराव देशमुख, माणिक वाकुरे, सतीश तिवारी, पोलिस पाटील राहूल वाकुरे, प्रभाकर गाढवे,दौलत गाढवे, दत्ता तिवारी, राजेंद्र लोहार, साहेब देशमुख, राजपाल देशमुख, बप्पा लंगडे आदी उपस्थित होते. लोहारा येथे कार्यक्रम गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती लोहारा येथे सोमवारी (दि.६) शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. शिवस्वराज्य दिनानिमित्त गुढी उभारण्यात आली होती. या कार्यक्रमास पंचायत समितीच्या नूतन गटविकास अधिकारी शितल खिंडे, गटशिक्षणाधिकारी भास्कर बेशकराव, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाचे मोहन सरवदे, लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एकनाथ सुर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी अशोक कटारे उपस्थित होते. अनंत लहाने यांनी उपस्थितांचे आभार मानले. जिल्हाभरात झालेल्या कार्यक्रमांमध्ये लोकांचे प्रबोधनही करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...