आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:शिवराज्यभिषेक सोहळा अजरामर दिवस ; डॉ. दीपा सावळे यांचे प्रतिपादन

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इतिहासातील अजरामर असा दिवस म्हणजेच शिवराज्याभिषेक सोहळा असून तो साजरा करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. दीपा सावळे यांनी महाविद्यालयात आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमात केले. श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित रा. गे.शिंदे व संत गाडगेबाबा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ.दीपा सावळे, प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे, प्रा.डॉ.महेशकुमार माने, प्रा.डॉ.विद्याधर नलवडे, प्रा. शंकर कुटे, संभाजी धनवे आदी उपस्थित होते. यावेळी विज्ञान विभागाचा विद्यार्थी लक्ष्मण शेजवळ याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पना या विषयी मनोगत व्यक्त केले तर कला विभागाची विद्यार्थिनी आरती नलवडे हिने छत्रपती महाराजांचा पोवाडा सादर केला. प्राचार्य डॉ. दीपा सावळे म्हणाल्या की, शिवरायांनी १६७४ पर्यंत स्वराज्याचा विस्तार खूप वाढला होता. तरीही तोपर्यंत शिवराय हे तांत्रिकदृष्ट्या मोगली मनसबदार होते. शिवरायांनी आपल्या कर्तबगारीने मनगटाच्या बळावर आपले स्थान निर्माण केले होते. त्याला एक कायदेशीर स्वरूप देणे गरजेचे होते. राज्य स्थापन करण्याची जरुर होती शिवरायांचा राज्याभिषेक झाला पाहिजे अशी सुप्त इच्छा प्रजेच्या संवर्गात पसरली होती. तीच इच्छा इतिहासात एक अजरामर असा सोहळा ठरली. यावेळी प्रा. सचिन साबळे, हनुमंत मार्तंडे,अरुण माने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...