आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून प्रशासनाचा निषेध

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज व मराठा बांधवांचे श्रद्धास्थान असलेले कोल्हापूर नरेश छत्रपती संभाजीराजे भोसले हे आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी तुळजाभवानी मंदिरात आल्यानंतर कुठलाही प्रोटोकॉल न पाळता व मंदिरात कोणताही प्रशासकीय अधिकारी हजर नसताना आई तुळजाभवानी मंदिरात देवीच्या गर्भगृहात दर्शनासह प्रवेश करण्यास मज्जाव केल्याप्रकरणी संबंधित अधिकारी नागेश शितोळे यांचा शिवराज्याभिषेक सोहळा समितीने तीव्र शब्दांत निषेध केला असून, याप्रकरणी संबंधितांवर तातडीने कारवार्इ करावी, अशी मागणी केली आहे.

त्रात म्हटले आहे की,मंदिराचे धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांनी दर्शनास मज्जाव केल्याने तमाम छत्रपती प्रेमींचे मन दुखावले गेले आहे. शिवछत्रपतींच्या वंशजांचा मानसन्मान न राखणाऱ्या अशा मुजोर अधिकाऱ्यांस तत्काळ निलंबित करून कठोरात कठोर कारवाई करावी तसेच यापुढे अशी घटना घडू नये, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. दोषींवर कार्यवाही न झाल्यास समिती उग्र आंदोलन करेल, असे निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे जयराज खोचरे,ॲड. संजय शिंदे, ॲड. प्रशांत जगदाळे, दत्तात्रय साळुंके, कुणाल जानराव, ॲड. ओमकार शितोळे, गुंडोपंत जोशी, अमोल पवार, संतोष घोरपडे, बालाजी कदम, सुरज ढेरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...