आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओमराजे - राणा जगजितसिंह यांच्यात खडाजंगी:औकात अन् हमरी- तुमरीची भाषा पीकविमा बैठकीत विरोधकांना डावलल्याने रोष

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबादेत खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. पीकविम्याच्या मुद्यावर त्यांच्यात हमरी- तुमरी झाली आणि अरे तुरेची भाषाही उभयतांनी वापरली. हा प्रकार उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी घडला.

ओमराजेंनी सुनावले

ओमराजे यांनी राणा जगजितसिंह यांचा एकेरी भाषेत उल्लेख करीत ''ए तु निट बोल तुमची संस्था आणि तुमची औकात मला सर्व माहित आहे. औकातीत राहा.

काय आहे प्रकरण?

जिल्हाधिकारी कार्यालयात पाटील आणि निंबाळकर परिवारात जूना राजकीय वाद आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात पीकविम्याची बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयात राणा जगजितसिंह पाटील हे एकटेच होते. शेतकऱ्यांच्या मागणीवर खासदार ओमराजे निंबाळकर तिथे पोहचले. जिल्हाधिकारी यांना त्यांनी काही प्रश्न विचारले.

अरे बाळ आहेस तू

राणा जगजितसिंह पाटील यांनी यावेळी ओमराजे निंबाळकर यांना टोकले. त्यानंतर तू बाळ आहेस असा उल्लेख केला. यावरुन संतापलेल्या ओमराजे यांनी राणा जगजितसिंह यांना औकातीत राहण्याची भाषा वापरली. यादरम्यान त्यांच्यात मोठा वादही झाला. एकमेकांना हमरी - तुमरीची भाषा वापरली गेली.

संतप्त झालेले खासदार ओमराजे निंबाळकर.
संतप्त झालेले खासदार ओमराजे निंबाळकर.

जे संस्कार आहे तसे...

राणा जगजितसिंह पाटील यांना ओमराजे निंबाळकर यांच्यावर जे संस्कार आहेत त्यानुसार ते बोलले असे वक्तव्यही यावेळी केली. त्यानंतर पुन्हा ओमराजे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. राणा जगजितसिंह यांनी ओमराजें यांचा बाळ असा उल्लेख केला. यावर तु मला सांगू नको तुझी औकात काय अशी भाषा वापरली.

मोठ्या काळानंतर आमने - सामने

उस्मानाबाद जिल्ह्यात पवनराजे निंबाळकर हत्याकांडानंतर वेगळी किनार मिळाली. बऱ्याच वर्षांनंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे हे समोरा-समोर आले.

सत्ताधाऱ्यांनाच का बोलावता?

374 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडत असताना विमा कंपनीची हे लोक एजंटगिरी करीत आहेत. सुप्रीम कोर्टाने रक्कम द्या म्हटल्यानंतरही सरकारी वकीलाचे काम होते की सुप्रीम कोर्टाची ऑर्डर द्या म्हणून. पण दिले जात नसेल तर शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. शेतकऱ्यांना तक्रारी घेऊन या असे म्हटले जाते, पण त्यांना डावलले जाते. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनाच बोलावले जाते.

बातम्या आणखी आहेत...