आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवस्वराज्य दिन:कसबे तडवळे  ग्रामपंचायतीच्या वतीने शिवस्वराज्य दिन ; सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती

कसबे तडवळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी दि.६ रोजी सकाळी शिवस्वराज्य दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ग्रामपंचायतीसमोर स्वराज्य गुढी उभारून अभिवादन करण्यात आले. यावेळी एसपी शुगरचे चेअरमन तथा उपसरपंच सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामपंचायतीकडून उभारण्यात आलेल्या या गुढीची गावातील शिवप्रेमी नागरिक दत्तात्रय कदम यांच्या हस्ते श्रीफळ फोडून पूजा करण्यात आली.यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणण्यात आले. कार्यक्रमासाठी सरपंच मन्मथ आवटे, ग्रामविकास अधिकारी संजय राठोड, तलाठी शशिकांत यादव, ग्रां.प.सदस्य याकुब फकीर,दत्तात्रय पानढवळे ,सुहास सावंत,दिपक मुळूक,मयुर धनके, दत्तात्रय कदम,भास्कर जमाले, याकुब फकिर, नंदादीप सोनवने बापू माळी, महेबुब कोरबू, सिद्धेश्वर सुरवसे, निळकंठ गायकवाड, धर्मा निकम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान उस्मानाबाद शहर आणि जिल्हयात ठिकठिकाणी शिवस्वराज्य दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...