आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खताचा तुटवडा‎:रब्बीत युरियाचा तुटवडा,‎ उत्पादन घटीची शक्यता‎

तामलवाडी‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यात ऐन रब्बी‎ हंगामात युरिया खताचा तुटवडा‎ निर्माण झाला असून रब्बीच्या ‎ ‎ उत्पादनात घट येण्याची शक्यता‎ निर्माण झाली आहे. यामुळे ‎ ‎ शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण‎ आहे. अति पावसामुळे खरीप हंगाम ‎पूर्णतः वाया गेल्यामुळे शेतकरी‎ आधीच मेटाकुटीला आले आहेत.‎ असे असताना खरिपातील‎ नुकसान रब्बी हंगामात भरुन‎ काढण्यासाठी शेतकरी प्रयत्नरत‎ आहेत.

मात्र, ही आशाही आता‎ पूर्णतः मावळताना दिसत आहे.‎ जानेवारीमध्येच युरिया खताचा‎ तुटवडा निर्माण झाला आहे. कृषी‎ दुकानामध्ये युरिया मिळत‎ नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले‎ आहेत. ग्रामीण भागातील कृषी‎ दुकानांमध्ये खत मिळत नसल्यामुळे‎ शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी येत‎ आहेत. मात्र, तेथेसुद्धा खत उपलब्ध‎ ‎ ‎ नसल्याचे कृषी दुकानदार‎ शेतकऱ्यांना सांगत आहेत. काही‎ कृषी दुकानदारांकडे युरिया खत‎ उपलब्ध असताना देखील खताचा‎ तुटवडा दाखवून शेतकऱ्यांकडून‎ अधिकची रक्कम घेण्यात येत आहे.‎ याचा शेतकऱ्यांना फटका बसत‎ असून उत्पन्नावर परिणाम होत‎ आहे. कृषी विभागातील वरिष्ठ‎ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन‎ खत उपलब्ध करून देण्याचे मागणी‎ शेतकऱ्यांमधून होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...