आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मास्टर जलतरण स्पर्धेचे आयोजन:उस्मानाबाद येथील श्रावणी रणखांब हिचे जलतरणच्या दोन प्रकारात यश

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉकीचे जादूगर ओलंपिक गोल्ड मेडलिस्ट मेजर ध्यानचंद यांच्या २९ ऑगस्ट हा जन्मदिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून लातूर येथे मास्टर जलतरण स्पर्धेचे लातूर ऑफिसर्स क्लब तर्फे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ५० मीटर फ्रीस्टाइल व ब्रेस्ट स्टाइल या स्पर्धेचा समावेश होता.

यामध्ये १४ वर्षाच्या पुढील मुले व मुली यांनी भाग घेतला होता या स्पर्धेमध्ये १६८ मुले व मुली यांचा सहभाग होता. यामध्ये उस्मानाबाद येथील श्रावणी पांडुरंग रणखांब हिने दोन्ही खेळामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे व लातूर ऑफिसर्स क्लब तर्फे तिला मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. त्याबद्दल जलतरण जिल्हा असोसिएशन अध्यक्ष रणजित रणदिवे व असोसिएशन तर्फे तिचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...