आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध पुरस्कार:सामाजिक कार्याचा वसा घेतलेले उमरगा शहरातील श्री गणराज गणेश मंडळ

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमासह महिला, युवती व ज्येष्ठनागरिक, शालेय मुलांना सहभागी करत सामाजिकतेचा वसा जपणारे आणि विविध पुरस्कार पटकावणारा शहरातील सर्वांच्या परिचयाचे गणेश मंडळ म्हणजे गणराज गणेश मंडळ होय गणेशोत्सव काळात गेल्या २३ वर्षापासून अध्यक्ष बालाजी पाटील यांचे पुढाकाराने तालुक्यात एक सामाजिक चळवळ गतीमान करणारे आरोग्यनगर येथील गणराज गणेश मंडळ होय.

श्री गणराज गणेश मंडळाने गेल्या अठरा वर्षापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून स्वतःची एक वेगळी ओळख शहरवासियाना करून दिली. गणेशोत्सव काळात गणराज नटसम्राट स्पर्धा, जेष्ठागौरी आरास स्पर्धा, कोण बनेल गणराज लखपती, शरीरसौष्ठव स्पर्धा, पाक कला स्पर्धा, शालेय विद्यार्थी व खुल्या प्रश्नमंजुषा, निबंध, सुंदर हस्ताक्षर, रांगोळी, मेहंदी, चालता बोलता, हमाल स्पर्धा, श्री गणराज स्मार्ट सूनबाई आदी स्पर्धेसह जलपुनर्भरण, जल संवर्धन, वृक्षलागवड, आरोग्य उपक्रमासोबत विविध क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा गौरव करीत गणेशोत्सव केवळ उत्सव न होता एक सामाजिक चळवळ म्हणून प्रचलित झाले आहे. डॉल्बीमुक्त, शांततेत, नियोजित वेळात विसर्जन आणि विविध कार्यक्रमामुळे सलग सहा वर्ष तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करणारे एकमेव गणेश मंडळ होय.

मंडळाने स्मार्ट सुनबाई यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सासू-सून, नंद-भावजय व पती-पत्नी यांच्या दोन जोडयातही स्पर्धा संपन्न झाल्या. प्रश्न-उत्तर, उखाणे, मूकअभियन, गाण्यांच्या भेंडयासह दोन कृती फेऱ्या घेण्यात आल्या आहेत. उत्कृष्ट गणेश मंडळास रोटरी क्लब, पोलिस ठाणे व विविध मंडळाच्या सहकार्याने उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळास बक्षिस देण्याचा निर्णय घेतला होता. मंडळाचे अध्यक्ष तथा माजी पाणीपुरवठा सभापती बालाजी पाटील, गोपाळ जाधव, मनोज जाधव, मनोज पाटील, बाळु माळी, राजु चेंडके, जगदीश सुरवसे, श्रावण कटके, कुलदीप पाटील, लक्ष्मण खरटमोल, सलमान शेख यांच्यासह कार्यकर्ते स्थापनेसह कार्यक्रमापासून मिरवणूकीपर्यंत परिश्रम घेतात.

यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव
राज्यासह जिल्हा व तालुक्यात कोरोना संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर पोलिस, पालिका अन आरोग्य प्रशासनासह सामाजिक संघटना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग थांबविण्यासाठी प्रयत्न करीत असताना गेल्या दोन वर्षात गणेशोत्सव साधे पध्दतीने करत प्रशासनास कोरोना हद्दपार करण्यासाठी सहकार्य करण्यात आले. यंदाच्या वर्षी ही साध्या पध्दतीने करून पुढील काळात पुन्हा नवी उमेद व जोमाने सामाजिक, शैक्षणिक, लोकोपयोगी कार्यक्रम घेवून आदर्शवत परंपरा जोपासणार आहे. असे श्री गणराज गणेश मंडळाचे अध्यक्ष बालाजी पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...