आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्माष्टमी:तुळजापुरात लिट्ल फ्लॉवर्स मराठी शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

तुळजापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिट्ल फ्लॉवर्स मराठी प्राथमिक शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाची वेशभूषा केली होती.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजय पवार यांच्या सह विक्रम माडजे, विनायक राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी मुख्याध्यापक पवार यांनी श्रीकृष्णाच्या बाललीलांची माहिती सांगितली. यामध्ये मुलांना समजेल अशा भाषेत श्रीकृष्णाच्या गुणलीलांचे वर्णन केरण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता हिप्परगेकर यांनी तर प्रास्ताविक नुतन ठाकरे यांनी केले. या प्रसंगी सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचा सह बहुसंख्य पालक उपस्थित होते. शाळेच्या वतीने विविध कार्यक्रम तसेच मुलांच्या कौशल्य व गुणांना वाव दिला जातो.

बातम्या आणखी आहेत...