आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूलचे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी परीक्षेमध्ये अपेक्षेप्रमाणे दैदिप्यमान यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली शाळा म्हणून श्रीपतराव भोसले हायस्कूल ची ओळख आहे. दहावी या वर्गामध्ये परीक्षेला एकूण ८९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
८९६ पैकी ८९५ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. एकूण निकाल ९९ .२०% असा लागला असून शंभर पैकी शंभर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आठ विद्यार्थी आहेत. ९५ टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेले १३८ विद्यार्थी ९० ते ९५ टक्के यामध्ये गुण घेतलेले १७३ विद्यार्थी व ७५ ते ९० टक्के यामध्ये गुण घेतलेले ४२६ विद्यार्थी व ५० ते ७५ टक्के यामध्ये गुण घेतलेले विद्यार्थी १५८ विद्यार्थी तर ५० टक्के पेक्षा कमी गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आठ विद्यार्थी आहेत .या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले ९०% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षश्री. सुधीर आण्णा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी संजीव बागल पाहुणे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य देशमुख यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष सुधीर अण्णा पाटील यांनी यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांच्या समोर बोलताना त्यांना शुभेच्छा दिल्या, पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, लातूर च्या धर्तीवर आपण उस्मानाबाद मध्ये उच्च शिक्षणमध्ये उस्मानाबाद पॅटर्न तयार करत आहोत.
या प्रसंगी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्था सचिव सौ . प्रेमाताई पाटील,प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील,संस्था सदस्य तथा वित्त अधिकारी संतोष कुलकर्णी तसेच प्रशालेतील सर्व पदाधिकारी पर्यवेक्षक वाय .के इंगळे,सौ बी .बी गुंड, टी.पी.शेटे, आर .बी.जाधव, के.वाय. गायकवाड, डी .ए.देशमुख व उपस्थित होते. सूत्रसंचालन एस.सी पाटील व प्रा . कापसे सर यांनी केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.