आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भवानीक:दहा कोटी खर्चून उभारलेल्या भवानी कुंडात उगवली झुडुपे

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेकडो भाविकांना एकाचवेळी स्नानाची सोय व्हावी म्हणून उभारलेल्या बीडकर तलाव येथील भवानी कुंडाची वापराअभावी दुरवस्था झाली आहे. कायम बंद असलेल्या भवानी कुंडात झाडे-झुडुपे उगवली आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधी पाण्यात गेले. दरम्यान आगामी नवरात्रोत्सवापूर्वी भवानी कुंडाची स्वच्छता करण्याचे पालिकेसमोर आव्हान असणार आहे.

तुळजापूर विकास प्राधिकरणातून १० कोटी खर्चून भवानी कुंड उभारले आहे. कुंडात आंघोळीसाठी दोन स्वतंत्र कुंड आहेत. येथे एकाचवेळी शेकडो भाविकांची स्नानाची सोय उपलब्ध होती. मात्र, नवरात्र महोत्सव वगळता इतरवेळी भवानी कुंड वापराअभावी कुलुपबंद असल्याने पिंपळ, बाभळ आदी झाडे-झुडपे उगवली. पाण्यावर शेवाळ आले. देखभाल-दुरूस्ती अभावी कोट्यवधी पाण्यात गेले आहे. याची जबाबदारी निश्चित करून संबंधीतांकडून वसूली करण्याची मागणी होत आहे.

विकास प्राधिकरणाचे ३०० कोटी वाया तुळजापूर विकास प्राधिकरणातून ३०० कोटी रूपयांहून अधिक खर्च करुनही भाविकांना फायदा होत नसल्याने हे पैसे वाया गेले असून याच्या चौकशीची मागणी होत आहे. २४ तास पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली. शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. अनेकदा मुदतवाढ तसेच दरवाढ देऊनही भुुयारी गटार योजना फेेेल गेली. रस्ते, बगीचा, वाहनतळाची दुरावस्था झाली आहे.

स्वच्छतागृहांची मोडतोड
भवानीकुंड येथे स्नानासाठी महिला व पुरुषासांठी दोन स्वतंत्र तलाव आहेत. शिवाय मोठ्या संख्येने स्वच्छतागृह, चेजींग रूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. संगीत कारंजाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाचा उदासीनतेमुळे भवानी कुंडातील स्वच्छतागृहासह चेजींगरूमची मोडतोड करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...