आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकळंब तालुक्यातील खामसवाडी येथे महावितरण उपकेंद्रात रोहित्र जळाल्याने पंधरा दिवस पिण्याच्या पाण्यासह,जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता गावकऱ्यांनी कार्यकारी अभियंता उस्मानाबाद यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करुन उपकेंद्रात रोहित्र चालु करुन घेतले. गावकऱ्यांसह ,खामसवाडी शिवारातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला . पूर्वी शेतात सिंगल फेज लाईट चालू होती. परंतु उपकेंद्रातील रोहित्र जळाल्यापासुन शेतातील सिंगल फेज लाइट बंद केल्याने पारधी वस्ती, गरड वस्ती, गर्जे वस्ती व सिरसट वस्ती वरिल अंदाजे सातशे व इतर शंभरअसे आठशे कुटुंब अंधारात आहेत. तरी कार्यकारी अभियंता उस्मानाबाद यांनी शेतातील सिंगल फेज लाईट चालु करावी अशी मागणी ग्रामस्थ व भाजप तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे.
याबाबत बोलताना प्रभारी सरपंच प्रभाकर शेळके म्हणाले की, कोरोना माहामारी या कालावधीत बरे च बाहेरगावी रोजीरोटी साठी गेलेले व गावातील ग्रामस्थ शेतात वास्तव करत आहेत. परंतु दि. ४ जून पासून शेतातील सिंगलफेज बंद केल्यामुळे वयोवृद्ध व मुले अंधारात रात्र काढावी लागत आहे. तरी लवकरात लवकर शेतातील सिंगल फेज चालु करावा.
राजेश गरड हे शेतकरी म्हणाले की, चार वर्षांपूर्वी गावात पाणीटंचाई झाल्याने पुर्ण घर शेतात घेऊन रहात आहे परंतु रोहित्र जळाल्यापासुन शेतातील सिंगल फेज लाईट बंद केल्यामुळे रात्र झोपणे कठिण झाले आहे. शेतकरी महादेव शेळके म्हणाले की, सध्या शाळा चालू होऊन एक आठवडा झाला आहे. शेतातील व वस्तीवरील संध्याकाळी शेतातील लाईट नसल्यामुळे बरेच विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहिले आहे अचानक लाईट खात्याने निर्णय घेतल्याने अडचण झाली तरी शेतातील सिंगल फेज चालू करावी. आता पावसाळा तांेडावर आलेला आहे. या काळात जर अंधार असाच कायम राहिला तर चोऱ्यांचे संकट येऊ शकते तसेच अंधाऱ्या रस्त्यांवर व वस्तीत अपघात होण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त होत आहे.
वर्क फ्रॉम होम करण्यास अडचणी
कोरोना माहामारी पासून घरी( शेतात) संगणकावर कंपनीचे काम चालू आहे. उपकेंद्रातील रोहित्र जळाल्याने काम करणे अवघड झाले आहे. लाईट नसल्याने काम होत नाही तरी लवकरात लवकर शेतातील सिंगल फेज लाइट चालू करावी. ईश्वर शेळके, खामसवाडी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.