आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाहेब, ‘आमचा समाज मागासलेला असून मुलांना शिक्षणाचे महत्त्व नाही. आमच्या मुलांना शिकवा, नोकऱ्या द्या, आम्हाला सन्मानाने जगायचे आहे’, अशी विनवणी पारधी समाजबांधवांनी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे केली. पोलिस अधीक्षकांनी भटक्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक व सहायक पोलिस अधीक्षक एस. रमेश यांच्या अध्यक्षतेखाली कळंब पोलिस ठाणे हद्दीतील पारधी समाजातील लोकांसाठी मार्गदर्शन शिबिर घेतले. शिबिरात यापूर्वी प्रशिक्षण घेत रोजगाराची संधी मिळालेल्या दोन मुलांनी त्यांचे अनुभव व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रभारी पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड, जिल्हा विशेष शाखा पोलिस निरीक्षक दासुरकर, कळंब सपोनि अतुल पाटील, सपोनि कल्याण नेहरकर, पोलिस उपनिरीक्षक रामहरी चाटे, अमोल मालुसरे, वर्षा साबळे, बाजार समितीचे सचिव वाघ, सामाजिक कार्यकर्ता मनिषा वाघमारे व पारधी समाजातील १०० ते १२५ व्यक्ती हजर होते.
पोलिस अधीक्षकांनी केले आश्वस्त
शिबिरात पारधी समाजबांधवांनी पोलिस अधीक्षकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सन्मानाने जगण्यासाठी आमच्या हाताला काम पाहिजे. मुलांना चांगले शिक्षण पाहिजे. तसेच ज्या मुलांनी शिक्षण घेतले आहे, त्यांना नोकरी अथवा लघुउद्योगासाठी मदत करावी. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्यांना मदतीबाबत आश्वस्त केले.
तरूणाईला रोजगार, लघुउद्योग योजनांची माहिती
शिबिरात केंद्र व राज्य सरकार राबवत असलेल्या दिनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत सुशिक्षित बेरोजगार तरुण व तरुणींसाठी उपलब्ध असलेल्या रोजगार संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शासनाच्या घरकुल, स्वयंरोजगार, लघु उद्योगासंदर्भात वेगवेगळ्या योजनांबाबत माहिती देण्यात आली. पारधी समाजातील बेरोजगार तरुण व तरूणींची नावे घेत त्यांना प्रशिक्षण देण्याबाबत आश्वासित करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.