आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष देण्याची गरज:‘त्या’नालीवरील स्लॅबचे काम अर्धवट, वाहतुकीला अडथळा ; नागरिकांतून संताप व्यक्त

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस मुख्यालय ते कोहिनूर हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नालीच्या स्लॅबला भग्दाड पडल्याने दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, काम एक महिन्यापासून अर्धवट असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे वाहनधारकांसह नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. उस्मानाबाद शहरातील पोलिस मुख्यालय ते कोहिनूर हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नालीच्या स्लॅबला भग्दाड पडल्याने प्रथम ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या दहा दिवसांत पुन्हा नालीचा स्लॅबला भग्दाड पडले.

यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण झाल्याने दैनिक दिव्य मराठीने वृत्त प्रकाशीत केले होते. त्यानंतर काही दिवसांत दुरुस्तीला सुरूवात झाली असून अर्धा स्लॅब टाकल्यानंतर एक महिन्यापासून नालीवरील स्लॅबचे काम बंद आहे. यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरातील पाटबंधारे विभाग, आनंदनगर, समतानगरमध्ये जाण्यासाठी औरंगाबाद-उस्मानाबाद बसस्थानक रस्त्याहून पोलिस मुख्यालयापासून आत जावे लागते. मात्र, मुख्य रस्त्याहून आत जाणाऱ्या नालीवरील स्लॅबचे काम एक ते दीड महिना होऊनही अर्धवट आहे.

पालिकेने लक्ष देण्याची मागणी अर्ध्या रस्त्यातून वाहतूक करण्यास अडचण होत असून शेजारी बांधकामासाठी खोदकाम केले आहे. यामुळे डबल वाहन जाताना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नालीवरील स्लॅबवरील भगदाड असल्याने रात्री वेगाने आलेल्या वाहनांचे टर्न घेताना चाक अडकत आहे. यामुळे वाहन चालकांचा मनस्ताप वाढला आहे. नालीवरील स्लॅबचे अर्धवट काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याची गरज आहे. याकडे पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...