आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवास पर्यटन:उस्मानाबाद आगारामधून सुरळीत बससेवा सुरू; पुण्यासाठी 16 बसेस

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संप कालावधीनंतर पुन्हा बससेवा पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे आता उस्मानाबाद आगारातून जिल्ह्यासह परराज्यात आणि लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुण्यासाठी एका दिवसाला तब्बल १६ बसेस आहेत. त्याच बरोबर पणजी, सुरत, मुंबई, कोल्हापूर, नांदेडसाठी ही बसेस धावत असून बससेवा संप आणि कोरोना काळाच्या पूर्वीसारखी पूर्वपदावर आल्याचे आगार प्रमुख पांडुरंग पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

राज्य शासनात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे विलिनीकरण करून कर्मचाऱ्यांना शासकीय सुविधा मिळण्यासाठी संप पुकारला होता. सहा महिन्यांनंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. या काळात एसटीची सेवा अनेक मार्गावर विखंडीत झाली होती. दरम्यानच्या काळात काही कर्मचारी कामावर पुन्हा रुजू होत गेल्याने मोजक्या मार्गावर बस सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांची मागणी अधिक आणि बस संख्या आणि फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यातच अनेक मार्गावर बस नसल्याने हजारो प्रवाशांची खासगी वाहन चालकांकडून लूट करण्यात आली होती.

मात्र, न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे आता कोरोना काळात आणि संप काळात खंडीत झालेली बस सेवा पूर्वपदावर आल्याचे समोर आले. परिणामी सामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद आगारातून दर आर्ध्या तासाला लातूर मार्गावर शटल सेवा सुरू करण्यात आली आहे. बार्शी मार्गावर दर एक तासाला, औसा आणि लोहारा मार्गावर पाऊण तासाला, उस्मानाबाद ते वैराग मार्गावर एक तासाला शटल सेवा सुरु आहे.

अशी आहे बसची सुविधा
उस्मानाबाद पुणे- सकाळी ६ वाजता, ८, ९.४५, ११, १२, १, २, ५.३०, रात्री १०, ११ वाजता साधी बस. शिवशाही एसी - ११ वाजता, १२, १ आणि १० वाजता. निमआराम – सकाळी आठ आणि दुपारी २ वाजता.
उस्मानाबाद -मुंबई – सकाळी ७ वाजता, रात्री नऊ, सात, आठ वाजता.उस्मानाबाद – सुरत- सकाळी सात वाजता, रात्री आठ वाजता दोन्ही वेळा एक साधी, एक निमआराम. उस्मानाबाद -सुरत, उस्मानाबाद – बोरिवली, उस्मानाबाद हैद्राबाद, उस्मानाबाद कोल्हापूर, उस्मानाबाद -पणजी, उस्मानाबाद -भिवंडी, उस्मानाबाद – औरंगाबाद, उस्मानाबाद -नांदेड, उस्मानाबाद – परभणी, उस्मानाबाद-हुमनाबाद.
मुक्कामी बसची सुविधा
उस्मानाबाद – कोंड, मुरुड, वैराग, टाकळी, धुत्ता आणि उस्मानाबाद बामणी या ठिकाणी पूर्वीसारख्या मुक्कामी गाड्या सुरु केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...