आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पोपहार‎:आषाढी साठी जाणाऱ्या भक्तांना अल्पोपहार‎; नळदुर्गचे नगरसेवक अहंकारी यांची 8 वर्षांपासून सेवा‎

नळदुर्ग‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नळदुर्ग येथील नगरसेवक विनायक ‎अहंकारी हे गेल्या आठ वर्षांपासुन ‎ ‎ आषाढी वारी साठी नळदुर्ग शहरांतुन ‎जाणाऱ्या भाविक भक्तांना घरी नाष्टा ‎चहा, पाणी देऊन त्यांना वारीसाठी ‎ ‎ रवाना करतात. यावेळीही दि.२० जुन ‎रोजी त्यांच्या कडून ही सोय करण्यात ‎आली होती. यानिमित्त भजनाचा ‎कार्यक्रम सुरू होता. त्यानंतर सर्व ‎ ‎ भाविकांना व गावातील नागरिकांना ‎ ‎ अल्पोपहार देण्यात आला.गेल्या आठ ‎वर्षांपासुन नळदुर्ग शहरातील‎ सरदारसिंग ठाकुर, प्रभाकर घोडके, ‎मारुती घोडके, शाम कनकधर,राजेंद्र‎ ठाकुर, रणजित डुकरे,निलकंठ‎ स्वामी यांच्यासह त्यांचे सहकारी हे‎ आषाढी वारीसाठी जात आहेत.‎

यावेळी माजी नगरसेवक बसवराज‎ धरणे, महालिंग स्वामी,माजी‎ नगरसेवक सुहास येडगे,पत्रकार‎ विलास येडगे, तानाजी जाधव, उत्तम‎ बनसगोळे,भाजपाचे माजी शहराध्यक्ष‎ पदमाकर घोडके,सामाजिक कार्यकर्ते‎ संजय विठ्ठल जाधव,अमर भाळे,‎ अरविंद माने,पिंटू जाधव,बंडप्पा‎ कसेकर. सुनिल बनसोडे,नंदकुमार‎ जोशी,प्रमोद जोशी,अरुण‎ जोशी,संतोष जाधव,नागु‎ बताले,प्रशांत जोशी,अमर जगदाळे,‎ सारंग जोशी उपस्थित होते.‎ आदर्श शिक्षक वसंतरावं अहंकारी‎ यांच्या हस्ते विठ्ठल - रुक्मिणी मातेची‎ पुजा करण्यात आली. दरम्यान‎ पंढरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर‎ राज्याच्या विविध भागातील‎ दिंड्यांचा समावेश आहे.यामध्ये‎ विविध जिल्हयांमधील भजनी मंडळे‎ व वारकरी संप्रदाय यांचा समावेश‎ असून ग्यानबा तुकारामचा गजर‎ करीत ते मार्गस्थ आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...