आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील एकुरगा येथील श्री शिवशक्ती विद्यालयातील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत यश मिळवले. प्रियंका उबाळे, आकांक्षा बोंडगे यांनी सोयाबीन पिकावरील गोगलगायींच्या प्रादुर्भावाची कारणे व उपाय यावर प्रकल्प सादर प्रकल्पाची पुणे येथील विभागीय स्तरावर निवड झाली.
जिल्हास्तरीय ३० वी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद उमरगा व लोहारा तालुका परिषद समुद्राळ येथील जय स्वामीनारायण विद्यालयात पार पडली. उमरगा व लोहारा तालुक्यातून ७३ प्रकल्प सादर झाले. यात प्रियंका उबाळे व आकांक्षा बोंडगे यांच्या प्रकल्पाच्या निवडीबद्दल ज्ञान विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बोंडगे यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा सत्कार झाला.
विज्ञान शिक्षक अजित साळुंके यांनी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चिंचोली जहागीर जिल्हा परिषद शाळेतील दिव्या सूर्यवंशी, मयुरी जाधव यांचा डास पळवून लावण्याचे साधन. डॉ. के. डी. शेंडगे इंग्लिश स्कूलची उन्नती चव्हाण यांचे तुमची परिसंस्था जाणून घ्या प्रकल्पाची निवड झाली आहे. लोहारा तालुक्यात सालेगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे ऋतुजा बिराजदार, प्रांजली गायकवाड नव्याने निर्माण झालेल्या जंगलातील जैविक व अजैविक घटकांचा शोध घेणे, भातागळी जिल्हा परिषद प्रशालेच्या संध्याराणी राठोड, रिया चव्हाण यांचे आयुर्वेदिक वनस्पती. या प्रकल्पांची विभागस्तरावर निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी शिक्षक धनराज पाटील, राजेंद्र सगर, विजया गायकवाड, सिद्धेश्वर वाकडे, महादेव करके, म्हाळप्पा कोकरे, सोमनाथ म्हेत्रे, दत्तू कांबळे, मोहन दूधंबे, शिवाजी चेंडके यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे पालक, ग्रामस्थांतून कौतुक करण्यात आले. यासाठी परीक्षक म्हणून प्रा. डॉ. राम कदम, प्रा. डॉ. सतीश शेळके, प्रा. आर. एस. पात्रे, प्रा. एस. ए. निकम यांनी परीक्षण केले.
यासाठी जय स्वामी नारायण विद्यालय मुख्याध्यापक प्रताप कोकाटे, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद जिल्हा शैक्षणिक समन्वयक अजित साळुंके, तालुका समन्वयक सदाशिव डिगुळे, लोहारा तालुका समन्वयक विनायक बगले आदींनी पुढाकार घेतले. यावेळी लोहारा तालुका विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण, उमरगा तालुका विस्तार अधिकारी कानडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दोन तालुक्यांतून ७३ प्रकल्प
राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत उमरगा-लोहारा तालुक्यातून एकूण ७३ प्रकल्पांची नोंदणी झाली होती. यातून पाच प्रकल्प विभाग स्तरावर निवडण्यात आले. उमरगा तालुक्यातून एकुरगा येथील श्री शिवशक्ती विद्यालयाच्या प्रियंका उबाळे, आकांक्षा बोंडगे यांचे सोयाबीनवरील गोगलगायींचा प्रादुर्भाव कारणे व उपाय, या प्रकल्पाची निवड झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.