आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचार आठवड्यापासून अपवाद वगळता दररोज दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. मात्र, रविवारी (दि.१९) अचानक पाच रुग्ण आढळले आहेत. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य प्रशासनाने सतर्क होण्याची तर नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत गेल्यास निर्बंध लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी स्वत:सह कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे.
तिसऱ्या लाटेनंतर जवळपास दोन महिने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निरंक होते. मात्र, तिसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदा २७ मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असून अपवाद वगळता प्रति दिनी नवे दोन रुग्ण निघत होते. रविवारी (दि.१९) एकाच दिवशी ५ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच ८ रुग्ण उपचाराखाली आहेत. २७ मे ते १९ जून दरम्यान ३१ नवे रुग्ण आढळले असून १४ बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे आरोग्य विभागासह नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. सध्या वातावरणात बदल झाला असून पाऊस होत आहे. यामुळे कोरोनासह अन्य साथीचे आजार बळावत आहेत. यामध्ये कोरोनाची साथ बळावू नये, यासाठी सामाजिक अंतर ठेवून मास्क वापरण्याची गरज आहे. नागरिकांनी कोरोनाच्या तीन लाटा पाहिल्या आहेत. यामध्ये पहिल्या लाटेत नागरिकांना मोठ्या संकटाला तोंड दिले आहे. दुसऱ्या लाटेत लस उपलब्ध झाल्याने मृत्यूचे प्रमाण कमी झाले. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा स्वास टाकला. मात्र, प्रत्येक वेळी कोरोना नव्या व्हेरिएंटमध्ये येत असल्याने प्रत्येक वेळी लस परिणामकारक ठरेल असे नाही.
यासाठी नागरिकांनी स्वत:हून सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर ठेवून गर्दीत तोंडाला मास्क लावण्याची गरज आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७४ हजार १९६ नागरिक बाधित झाले असून ७२ हजार ६१ नागरिक बरे झाले आहेत. तसेच १७ रुग्ण उपचाराखाली आहेत. २७ मे १९ जूनपर्यंत ३१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. अद्याप कोरोना हद्दपार झालेला नाही. संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जबाबदारी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी दुर्लक्ष केल्यास आगामी काळात रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्याच्या दिवसात घाणीमुळे अन्य साथीचे आजारही बळावतात. यात कोरोनाने पुन्हा रौद्र रुप धारण केल्यास आरोग्य विभागासह नागरिकांची गैरसोय होणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी कोरोनाच्या निकषाचे पालन करण्याची गरज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.