आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:आतापर्यंत 2; रविवारी चार कोरोना पॉझिटिव्ह आढळले

उस्मानाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार आठवड्यापासून अपवाद वगळता दररोज दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. मात्र, रविवारी (दि.१९) अचानक पाच रुग्ण आढळले आहेत. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य प्रशासनाने सतर्क होण्याची तर नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत गेल्यास निर्बंध लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी स्वत:सह कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे.

तिसऱ्या लाटेनंतर जवळपास दोन महिने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निरंक होते. मात्र, तिसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदा २७ मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असून अपवाद वगळता प्रति दिनी नवे दोन रुग्ण निघत होते. रविवारी (दि.१९) एकाच दिवशी ५ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच ८ रुग्ण उपचाराखाली आहेत. २७ मे ते १९ जून दरम्यान ३१ नवे रुग्ण आढळले असून १४ बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे आरोग्य विभागासह नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. सध्या वातावरणात बदल झाला असून पाऊस होत आहे. यामुळे कोरोनासह अन्य साथीचे आजार बळावत आहेत. यामध्ये कोरोनाची साथ बळावू नये, यासाठी सामाजिक अंतर ठेवून मास्क वापरण्याची गरज आहे. -------------

बातम्या आणखी आहेत...