आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना प्रतिबंधक उपाय:विविध गणेशात्सव मंडळांचे सामाजिक उपक्रम ; दहिफळमध्ये एक गाव, एक गणपती

कळंब24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील इटकूर येथील कुलस्वामिनी गणेश मंडळाने मिरवणूक रद्द करत निसर्गरम्य टेकडीवर दोनशे वृक्षांची लागवड करून आदर्श ठेवला आहे. पोलिसांच्या आवाहनाचा मान ठेवत इटकूर येथील सजग तरुणांनी एकत्र येत स्थापन केलेल्या कुलस्वामिनी गणेश मंडळाने ‘हरीत इटकूर’ उपक्रमांच्या सहयोगातून आपल्या अकराव्या वर्षी मिरवणुकीच्या खर्चाला टाळत कळंब इटकूर रस्त्यावरील कोठाळवाडी शिवारातील निसर्गरम्य परिसर असलेल्या ‘टोकणी’ च्या टेकडीवर दोनशे वृक्षांची लागवड केली आहे.यासाठी अध्यक्ष अक्षय वाघमारे, उपाध्यक्ष रविकांत मोटे, भारत बावळे, लिंबराज भुंगुर्डे,अभिषेक गुजर, प्रकाश फरताडे, मेजर शाम कदम, वैभव मीटकरी, सुजित कदम, किशोर पांढरे, कृष्णा एकशिंगे, गणेश गिरी, शाम पांढरे, अरबाज सय्यद ,दीपक भूंगुर्डे, सूरज मोटे,विश्वजीत मोटे, प्रशांत अडसूळ, आदर्श माने, कुणाल फरताडे, कुलदीप मोटे, प्रसाद पैठणकरयांनी परिश्रम घेतले.

देशी वृक्षांचे रोपण
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी एम रमेश, पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, पोहेकॉ पोपट जाधव, माजी पस उपसभापती लक्ष्मण आडसूळ, कोठाळवाडीचे सरपंच अनंत लंगडे,इटकूरचे सरपंच हनुमंत कस्पटे, उपसरपंच विलास गाडे, माजी उपसरपंच महादेव पावले,भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब फरताडे, रिलायन्स टेलिकॉमचे झोनल मॅनेजरअभिषेक गुजर, माजी उपसरपंच महादेव पावले,ग्राप सदस्य दत्तात्रय बावळे सचिन गंभिरे,दत्तात्रय बावळे, पत्रकार लक्ष्मण शिंदे, हरीत इटकूरचे अमर आडसूळ आदींच्या उपस्थितीत आठ प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.

नळदुर्ग जय हनुमान तरूण गणेश मंडळ
नळदुर्ग येथील जय हनुमान तरुण गणेश मंडळाने ऐतिहासिक किल्ला, नगरपालिका इमारत, पोलिस ठाणा इमारत, कोविड रुग्णालय, तसेच पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या देखाव्याचे उद्घाटन नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या हस्ते व श्रीक्षेत्र रामतीर्थचे महंत श्री विष्णुप्रसाद शर्मा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

जय हनुमान तरुण गणेश मंडळाचे पद्माकर घोडके, नागनाथ पांचाळ, शंकर वाघमारे, पद्माकर कोकणे व अजय ठाकुर यांच्या संकल्पनेतुन हा सुंदर देखावा उभा करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष महेश वाघमारे, उपाध्यक्ष किरण दुस्सा, कोषाध्यक्ष राहुल ठाकुर, सचिव अजय कांबळे, सहसचिव गजानन हळदे, सदस्य विनोद कोकणे, अजय कांबळे, जमनसिंग ठाकुर, विजय ठाकुर, रवी ठाकुर, दीपक कांबळे, बाळु वाघमारे, आदित्य काळे, आशुतोष घोडके व लाडप्पा घोडके यांनीही यासाठी परिश्रम घेतले.कोविड रुग्णालय उभे करून नागरीकांनी अजूनही सावधगिरी बाळगावी हा संदेश त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर मोबाईलचे युवा पिढीवर झालेले दुष्परिणाम, तसेच मोबाईलमुळे आपले पारंपरीक मर्दानी व शरीराला व्यायाम देणारे खेळ विसरले असल्याचेही या देखाव्यामधून दाखविण्यात आले आहे. वृक्ष तोडीमुळे झालेले दुष्परिणाम हा देखावाही करण्यात आला आहे.

माऊली गणेश मंडळाचा हनुमान चालिसा
नळदुर्ग येथील माऊली गणेश मंडळासमोर ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता श्रीक्षेत्र रामतीर्थ देवस्थानचे महंत श्री विष्णुप्रसाद शर्मा महाराज यांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती व हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. यावेळी प्रभाकर घोडके, सचिन डुकरे, श्रीकांत पोतदार,रोहित मोटे राजु ठाकुर,लखन भोसले, संकेत खद्दे,श्रीनिवास कुलकर्णी, ओम नकाते, सचिन भोई, अँड. धनंजय धरणे यांनी हनुमान चालीसाचे पठण केले.यावेळी तबलावादक चंद्रकांत कदम यांनी त्यांना तबल्याची साथ दिली.यावेळी माजी नगरसेवक संजय बताले, बसवराज धरणे, सुधीर हजारे, सुहास येडगे, समीर मोरे, भोई समाजाचे शहर अध्यक्ष सुनिल उकंडे,आरंभ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, सागर हजारे, विशाल डुकरे, संजय वेदपाठक, विलास येडगे व इतर उपस्थित होते.

माळुंब्रा व पारा येथे रक्तदान, दहिफळ येथे आरती
तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील त्रिमूर्ती गणेश मित्र मंडळ च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४५ गणेश भक्तांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना मंडळाच्या वतीने हेल्मेटचे वाटप करण्यात आले. माळुंब्रा येथील त्रिमूर्ती गणेश मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवात वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, नेत्र शिबिर, स्वच्छता मोहीम, अन्नदान आदी समाजपयोगी उपक्रम राबवण्यात येत असतात. मंडळाचे या वर्षी २६ वे वर्ष आहे. उस्मानाबाद येथील सह्याद्री ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पारा येथेही संघर्ष गणेश मंडळ वतीने रक्तदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.

रेणुका रक्तपेढी उस्मानाबाद च्या सहकार्याने हे शिबिर आयाेजित करण्यात आले होते. यात ५५ जणांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी अध्यक्ष कृष्णा महाजन, डॉ.बालाजी भराटे दिपक भराटे, विकास भराट,े शुभम भराटे यांनी परिश्रम घेतले. कळंब तालुक्यातील दहिफळ येथील नवतरूण गणेश मंडळाच्या एक गाव एक गणपतीची आरती माजी जिप.उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. ४९ वर्षाची एक गाव एक गणपती परंपरा कायम ठेवली आहे. यावेळी तात्या भातलवंडे, दत्तात्रय भातलवंडे व इतर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...