आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:नातेपुते मंडळात सामाजिक समावेशन उपक्रम ; कृषी विभागाचा उपक्रम चालूच राहणार

नातेपुते2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात नातेपुते कृषी मंडळांतर्गत २६ गावांमध्ये सेवा पंधरवड्यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. गावातील वंचित, आर्थिकदृष्ट्या कमकुवत, समाजापासून आलिप्त असलेल्या अनुसूचित जाती-जमाती, आधिवासी प्रवर्गातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांमध्ये सहभागासाठी याचे आयोजन करण्यात आले होते. कृषी विभागाचा हा उपक्रम पंधरवडा संपल्यानंतरही चालू राहणार असल्याबाबत व योजनात समाविष्ट होण्याबाबत मंडळ कृषि अधिकारी सतीश कचरे यांनी सांगितल. कोथळे, लोणंद, पळसमडळ, पिरळे, गुरसाळे या गावातील बांधवांनी सहभाग नोंदवला. या पंधरवड्यात सूक्ष्म सिंचन, यांत्रिकीकरण, फळबाग क्षेत्र विस्तार, शेतीशाळा, ज्वारी, हरभरा पीक प्रात्यक्षिक, क्रॉपसॅप, हॉर्ट सॅप, ऑन फार्म ट्रेनिग, विविध योजना निविष्ठा प्रशिक्षण, राष्ट्रीय पोषण अंतर्गत भाजीपाला मिनी किट वाटप, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग इत्यादी योजनात सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...