आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:नळदुर्गमध्ये 12 जून रोजी सोसायटी निवडणूक ; यावेळी सोसायटीचे सभासद उपस्थित होते

नळदुर्गएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नळदुर्ग येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक १२ जून रोजी होत आहे. आरोप प्रत्यारोपानी ही निवडणूक गाजणार असल्याचे दिसून येत आहे. ५ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील कृषी विकास आघाडी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ येथील अंबाबाई मंदिरात त्यांच्याच हस्ते नारळ फोडून करण्यात आला.यावेळी सोसायटीचे सभासद उपस्थित होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे व शिवसेनेचे कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील कृषी विकास आघाडी पॅनल व काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास सोसायटी बचाव पॅनल या दोन पॅनेलमध्ये चुरशीची निवडणूक होत आहे. प्रचाराचा शुभारंभ करताना कमलाकर चव्हाण,नगरसेवक नितीन कासार, सरदारसिंग ठाकुर,माजी नगरसेवक शरद बागल, दीपक काशिद, शाम कनकधर,पॅनलचे उमेदवार बेडगे संजय अप्पाराव, चव्हाण सुधाकर निवृत्ती, देवकर शिवाजी सगुणा, नागणे रघुनाथ निवृत्ती, पाटील शाहुराज भाऊराव, सय्यद ताजोद्दीन तय्यबअली,तिवारी मदन चंदुलाल,बनसोडे लक्ष्मीबाई ब्रम्हचार्य,पुदाले शंकर उर्फ अमृत,बिराजदार महादेव शंकर, जाधव उमाबाई दयानंद, मोटे अनिता सुरेश यांच्यासह सोसायटीचे सभासद उपस्थित होते. यावेळी बोलतांना अशोक जगदाळे यांनी म्हटले की, ही सोसायटी ८७ वर्षांपुर्वी स्थापन झालेली आहे. या सोसायटीचा कारभार हा नळदुर्गकरांच्याच हाती असला पाहिजे. उज्वल भविष्यासाठी कृषी विकास आघाडी पॅनलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडुन द्यावे असे आवाहन अशोक जगदाळे यांनी केले. यावेळी बोलतांना कमलाकर चव्हाण यांनी अणदुरच्या नेतृत्वावर घणाघाती हल्ला चढविला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार सरदारसिंग ठाकूर यांनी मानले. प्रचार शुभारंभ कार्यक्रमास येडोळा, वागदरी, मानेवाडी,जकनीतांडा व नळदुर्ग शहरांतील सोसायटीचे सभासद उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...