आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारभार चव्हाट्यावर:सॉफ्ट टेनिस स्पर्धांच्या तारखेमध्ये पुन्हा बदल

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद जिल्हास्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेच्या तारखेत अचानक बदल करण्यात अाला असून या पूर्वी १४ डिसेंबर रोजी होणारी स्पर्धा ४ डिसेंबर रोजी होणार असल्याचे कळवण्यात आले आहे. या पूर्वीही दोन वेळा स्पर्धेच्या तारखेत बदल करण्यात आला होता. दरम्यान अचानक करण्यात आलेल्या बदलाचा फटका विद्यार्थ्यांना बसणार असून क्रीडा व शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

शालेय क्रीडा स्पर्धा तब्बल दोन वर्षानंतर होत असल्याने विद्यार्थ्यांत उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या उत्साहावर शिक्षण विभागाच्या ढिसाळ नियोजनाने विरजन घातले आहे. स्पर्धेतील सहभागासाठी ऑनलाईन नोंदनीची अट घालण्यात आली आहे. मात्र, अनेक दिवस साईट ओपन होत नसल्याच्या तक्रारी होत्या. या संबंधात तालुका क्रीडा संयोजकाकडे संपर्क साधला असता त्यांनी अनभिज्ञता दर्शवत हात वर केले. दरम्यान अनेक अडचणींचा सामना करत विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत सहभाग निश्चित केला. मात्र, त्यानंतरही स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा प्रकार सुरूच असल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी सुरूच आहेत. तांत्रिक कारण पुढे करत साॅफ्ट टेनिस स्पर्धा १४ डिसेंबर ऐवजी ४ डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या स्पर्धा तालुका क्रीडा संकुल, नळदुर्ग रोड, तुळजापूर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या बदलाची सहभागी खेळाडूंनी आणि जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

दोन वर्षांनंतर स्पर्धा, विद्यार्थ्यांत उत्साह कोरोना महामारीमुळे खंडित झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धा तब्बल दोन वर्षानंतर होत असल्याने विद्यार्थ्यांत प्रचंड उत्साह आहे. मात्र, शिक्षण विभागाचा गलथान कारभार विद्यार्थ्यांचा मुळावर आला असून यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. स्पर्धेसाठी नियुक्त करण्यात आलेले तालुका क्रीडा संयोजक स्पर्धेविषयी अनभिज्ञ असल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. याबाबत बोलताना गट शिक्षणाधिकारी मल्हारी माने म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीची ड्युटी, जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा व इतर अडचणींमुळे स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करावा लागला आहे. ऑनलाईनमुळे कोणताही विद्यार्थी क्रीडा स्पर्धेपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे

बातम्या आणखी आहेत...