आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल:शंभर शेतकऱ्यांना माती नमुना अहवाल

उमरगा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन कस काढता येईल. यासाठी आता शेतकऱ्यांनी तंत्रशुद्ध शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे यांनी केले.

भारत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने सुरू केलेल्या माती परीक्षण व प्रयोगशाळा केंद्राच्या वतीने मंगळवारी (दि.२२) पहिल्या शंभर शेतकऱ्यांना त्यांच्या माती नमुन्याचा तपासणी अहवाल अन् अहवालातील त्रुटी व दोष याबद्दल मार्गदर्शन करण्यास शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी अध्यक्ष मोरे बोलत होते. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता निर्धारण केंद्र व भूगोल विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्राचार्य डॉ. जी. एच. जाधव, प्रमुख मार्गदर्शक कृषी अधिकारी एन. बी. बीडबाग, जिल्हा माती परीक्षण अधिकारी दीपक दहिफळे, तालुका कृषी मंडळ अधिकारी डी. डी. भालेराव, उमेदचे किशोर औरादे यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या शंका व प्रश्नांना उत्तरे देऊन मार्गदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, डॉ. संजय अस्वले, डॉ. डी. व्ही. थोरे, भूगोल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. डी. एस. इटले, माती परीक्षण केंद्र समन्वयक डॉ. ए. के. कटके, प्रा. डॉ. एस. एन. राठोड यांची उपस्थिती होती. मेळाव्यात शंभर शेतकऱ्याला त्यांच्या मातीच्या नमुन्याचा माती परीक्षण अहवाल देण्यात आला. प्रा. डॉ. इटले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. कटके यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राठोड यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...