आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील सोजर मुकबधीर शाळेचे जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत यश संपादन केले आहे.उस्मानाबाद येथे झालेल्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत येथील सोजर मुकबधीर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धामध्ये सहभाग घेऊन उत्तम कामगिरी केली आहे. मुकबधीर प्रवर्गातून मैदानी स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक तर सांस्कृतिक स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. यावेळी समाजकल्याण विभागाच्या वतीने सोजर मुकबधीर शाळेचे विशेष शिक्षक गणेश कानगुडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तर पहारेकरी अतुल खत्री यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सोजर मुकबधीर शाळेतील स्वरांजली ठोंबरे हिने १३ते १६ वर्ष वयोगटातील १०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. लांब उडी स्पर्धेत १३ते१६ वयोगटात वर्षा गायकवाड या विद्यार्थीनीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. गोळा फेक स्पर्धेत १७ ते २१ वयोगटात स्नेहा कोळी हिने द्वितीय क्रमांक पटकावला. १७ ते २१ वर्ष वयोगटातील राज वाघमारे याने गोळा फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
सुजित वडेकर याने १७ ते २१ वयोगटात गोळा फेक स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. स्नेहा कोळी हिने १७ ते २१ वयोगटात चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक. तर शिवम बाबर याने १७ ते २१ वर्ष वयोगटात त्रितीय क्रमांक पटकावला आहे. धनश्री बावकर हिने चित्रकला स्पर्धेत १३ ते १६ वयोगटात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे जिल्हा समाकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, संस्थेचे अध्यक्ष अरुण बारबोले व शाळेचे मुख्याध्यापक नरसिंह जगदाळे यांनी अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.