आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासूर्य हा ऊर्जेचा अपारंपरिक स्रोत आहे. त्यापासूनच प्रेरणा घेऊन मानवाने ऊर्जेची निर्मिती केली आहे. त्यामुळे ऊर्जेची बचत हेच उर्जेचे संवर्धन होय. सध्या खनिज तेल, नैसर्गिक वायू आदी ऊर्जा संसाधने उपलब्ध आहेत. काळानुरूप ऊर्जेचे स्वरूप, स्त्रोत बदलत आहेत. येणाऱ्या काळामध्ये संसाधनांचा गैरवापर टाळावा व बचत करावी. नवनवीन पर्यावरण आणि प्रदूषण विरहीत संसाधनांचा वापर करावा. समाजात ऊर्जा संवर्धन विषयक जनजागृती करावी. जास्तीत-जास्त सौर ऊर्जेचा वापर करावा, असे आवाहन ऊर्जा लेखापरीक्षक केदार खमितकर यांनी विद्यार्थ्यांना केले.
शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात पेट्रोलियम संवर्धन संशोधन संस्थेचे ऊर्जा लेखापरीक्षक केदार खमितकर यांनी शुक्रवारी (दि.३) ऊर्जा संसाधने व संवर्धन विषयावर मार्गदर्शन केले. केदार खमितकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरापासूनच साैर ऊर्जेच्या वापरास सुरुवात करावी. तसेच इतर ऊर्जा संवर्धनाचा पुढील पिढीसाठी एक आदर्श स्थापित करावा. दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून ऊर्जा संवर्धनाचा प्रचार व प्रसार करून ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व विविध घटकांना पटवून देणे हा या उपक्रमाचा भाग आहे.
ग्लोबल वॉर्मिंग सारख्या जागतिक स्तरावरील गंभीर समस्येला सामोरे जात असताना ऊर्जेचा काटकसरीने, कार्यक्षमतेने वापर होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी ऊर्जा संवर्धनाविषयी सर्व घटकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. यावेळी विद्यार्थ्यांना उर्जा बचत आणि संवर्धनाची शपथ देण्यात आली. या सूचनांचे पालन करावे उर्जा संवर्धनाकरिता दैनंदिन जीवनात काय करणे शक्य आहे, याबाबत काही सूचना देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांना उर्जा संवर्धन, संरक्षणाची शपथ केदार खमितकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केदार खमितकर यांनी विद्यार्थ्यांना ऊर्जा संवर्धन व संरक्षणाची शपथ दिली. गरज नसेल तेव्हा विद्युत उपकरणे आणि दिवे बंद करणे. वापरात नसेल तेव्हा विद्युत उपकरणांचे स्वीच बंद ठेवणे. कॉलेज व घरात सूर्यप्रकाशाचा जास्तीत-जास्त वापर करणे.
घरातील आतील भिंतींना व छताला फिक्कट रंग देणे. फ्रिजमध्ये बर्फ साचू न देणे. विजेच्या अती उच्च मागणी काळात म्हणजेच सकाळी सात ते ११ व सायंकाळी सहा ते दहा या वेळेत मोठ्या प्रमाणावर वीज उपकरणांचा वापर टाळावा आदी दैनंदिन जीवनातील ऊर्जा बचतीच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.