आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:शिंदे सरकारच्या काही मंत्र्यांना सत्तेची मस्ती ; अजित पवार यांचा आरोप

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेदांतासारखे रोजगार देणारे प्रकल्प राज्यातून निघून जातात हे सरकारचे अपयश नाहीये का? हे महाराष्ट्राचे दुर्दैव नाहीये का? दीड लाख कोटींचे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. राज्यातून मोठे कारखाने बाहेर जात आहेत. राज्यावर बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. दुसरीकडे शिंदे सरकारमधील काही मंत्र्यांना सत्तेची मस्ती आली आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. कसबे तडवळे (ता. जि. उस्मानाबाद) येथील एसपी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, एसपी शुगर्सचे अध्यक्ष सुरेश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पवार म्हणाले की, हिंदू-मुस्लिम, विविध जातीपातीत दरी निर्माण करण्याचा या सरकारचा उद्योग दुर्दैवी आहे. एखादा समाज एखाद्याला डोक्यावर घेऊ शकतो तर त्यालाच डोक्यावरून पायाखाली घेऊन तुडवूही शकतो. हे कोणी विसरता कामा नये, असे म्हणत मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांना त्यांनी इशारा दिला. काही मंत्र्यांना आपण काय बोलतोय, याचे भान नाही. लाथा मारा, बुक्क्या मारा यासाठी सत्ता घेतली आहे का तुम्ही? पक्षाच्या चिन्हावर निवडून येणार आणि त्या पक्षाच्या नेत्याला सोडून देणार आणि वेगळीच चूल निर्माण करणार. लोकांनी काय समजायचे? सत्तांतरामुळे अस्वस्थता आहे.

बातम्या आणखी आहेत...