आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्बुदिप बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रमाई फाउंडेशनच्या वतीने माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. ६) सायंकाळी ५.३० वाजता लेडीज क्लब येथे सुप्रसिध्द गायक, दिग्दर्शक, कलाकार, निर्माते अनिरुध्द वनकर यांचा प्रबोधनात्मक "रमाईची गाणी, अनिरुद्धची वाणी'' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम होत आहेत. याचे मुख्य आकर्षण गायक वनकर यांचा कार्यक्रमही असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार कैलास पाटील असतील. उद्घाटन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती असेल.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांचा व त्यांच्या मातांचा रमाई पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. रमाई महोत्सवाच्या कार्यक्रमात नागरिकांनी सहकुटूंब हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रमाई फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत यांनी केले आहे.
कार्यक्रमास मार्गदर्शन अरुण बनसोडे, यु. व्ही. माने, दिलीप वाघमारे, अॅड. सुदेश माळाळे, रावसाहेब शिंगाडे यांचे असणार आहे. ए. एस. सरवदे, शांतीनाथ शेरखाने, सुनिल बनसोडे, दिपक सरवदे, सुनिल मनोहर बनसोडे, श्रीकांत माळाळे, पी. के. बनसोडे, विजय गायकवाड, बाबासाहेब जानराव, सुशांत सोनवणे, मनोहर नाईकवाडे, सुनिल ढगे, संपतराव शिंदे, प्रमोद चव्हाण आदींचे सहाय्य असणार आहे. कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली.
उद्या दुपारी शोभायात्रा, विविध ग्रंथ, लेझीम पथकाचा असणार सहभाग
मंगळवारी दुपारी ३ ला माता रमाई प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. जम्बुदिप बुध्द विहार, बौध्द नगर, येथून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत शोभायात्रा होणार आहे. यामध्ये विविध ग्रंथ, लेझीम पथक, आकर्षक सजावट असणार आहे. तसेच विविध महापुरूषांची वेशभूषा केलेले विद्यार्थी सहभागी होणार आहेत. शोभायात्रेचे उद्घाटन शहर पोलिस ठाण्याचे पीआय उस्मान शेख, विविध क्षेत्रातील मान्यवर करणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.