आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे प्रदेश सहसचिव सोनवणेंची टेनिस कोर्टला भेट

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे सहसचिव रवींद्र सोनवणे व सोलापूर सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे सरचिटणीस शिवाजी वस्पटे यांनी तुळजापूर येथील टेनिस कोर्टला भेट देऊन पाहणी केली. तुळजापूर येथे राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा घेण्याबाबत यावेळी चर्चा झाली. तत्पूर्वी रवींद्र सोनवणे व शिवाजी वस्पटे यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष संदीप गंगणे, सचिव शेख व सॉफ्ट टेनिसचे प्रशिक्षक संजय नांगरे यांनी सोनवणे व वस्पटे यांचा सत्कार केला. यावेळी मेडिकल असोसिएशनचे जिल्हा संचालक किरण हगंरगेकर, सतीश हुंडेकरी, राजू गायकवाड, करण खंडागळे, प्रियांका हंगरगेकर, यश हुंडेकरी,प्रज्वल ढवळे, प्रथमेश अमृतराव, समर्थ शिंदे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...