आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी; खरीप हंगामात सोयाबीन पेरणीबाबत शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांचे आवाहन

उमरगा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगामात सोयाबीन पेरणी करण्याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे. त्यानुसार ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. हेक्टरी बियाणे ७५ किलोवरुन ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने अथवा प्लॅटरचा उपयोग करुन पेरणी करावी. सोयाबीनची उगवण क्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी बीजप्रक्रिया करावी.

रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रती दहा ते १५ किलो बियाण्यास खरीप पेरणीपूर्वी ३ तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे. नंतर त्याची पेरणी करावी. बियाण्यांची पेरणी तीन ते चार सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी. शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी स्वत:कडे उपलब्ध चांगले बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रीया करावी. चांगली ओल म्हणजे ७५ ते १०० मिलिमीटर मीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीन पेरणी करावी. ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत बियाण्यांची पेरणी करावी, असे आवाहन कृषी अधिकारी सागर बारवकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...