आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संततधार पाऊस:लोहारा तालुक्यातील सोयाबीन पीक धोक्यात, शेतकऱ्यांतून भरपाईची मागणी

लोहारा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात मागील काही दिवसांपासून संततधार पावसाने पिकांमध्ये पाणी साचून पिके पिवळी पडत आहेत. यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.सुरुवातीच्या महिन्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे तालुक्यात ५० टक्केच पेरणी झाली होती. परंतु, जुलैमध्ये पावसाने हजेरी लावली. तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीनची पेरणी सर्वाधिक झाली. सोयाबीनवर गोगलगाय व अळ्यांच्या हल्ला केला. गोगलगाय व अळींचा प्रादुर्भाव होऊन सोयाबीनच्या पानावर छिद्र पडले आहेत. त्यावर उपाय खर्चिक असल्याने शेतकऱ्यांना भुर्दंड सहन करावा लागला. मागील चार दिवसांत तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील अचलेर, आष्टा कासार, माकणी, सास्तूर भागात सततच्या पावसाने शेतकरी हैराण झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकात पाणी थांबले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. यावर्षी शेतकऱ्यांवर संकटांवर संकटे येत आहेत.

माकणी निम्न तेरणा प्रकल्प ७५ टक्के भरला: मागील काही दिवसांपासून लोहारा तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ओढे नाले प्रवाहित झाले असून माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. हा प्रकल्प ७५ टक्के भरला आहे, अशी माहिती शाखा अभियंता के. आर. येणगे यांनी दिली आहे.

आष्टाकासार परिसरामध्ये काही दिवसांपासून पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले. यामुळे पिकांची वाढ खुंटली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी. -ब्रम्हा सोमवंशी, शेतकरी आष्टाकासार.

बातम्या आणखी आहेत...