आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सोयाबीनचे दर दीड हजाराने घटूनही तेलाचे दर फक्त चार रुपयांनी कमी; दर 6 हजार रुपये क्विंटलपर्यंत कमी, कच्चा मालही उपलब्ध

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दैनंदिन स्वयंपाकातील प्रमुख घटक असलेल्या तेलात सोयाबीन तेलाचे प्रमाण सर्वाधिक असते. यंदा सोयाबीचे भाव क्विंटलमागे साडेदहा हजारांवर गेले होते. त्यामुळे सोयाबीन तेलाचे दर १६५ रुपये प्रति पाऊचपर्यंत (९०० एमएल) पोहोचले होते.

सद्यस्थितीत सोयाबीनच्या दरात तब्बल दीड हजार रुपयांची घसरण झाली. परंतु तेलाचे भाव केवळ चार रुपयांनी कमी झाले. दरम्यान, येत्या आठवड्यात तेलाचे दर आणखी पाच रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेंगदाणा, तीळ, सूर्यफूल, खोबरे, मोहरी आदी तेलाचा वापर खाद्यपदार्थ बनवताना केला जातो. त्यामध्ये मागील काही वर्षांपासून इतर तेलाचे दर जास्त असल्यामुळे सर्वसामान्यांकडून सोयाबीन तेलाला अधिक पसंती दिली जाते. मागील दोन वर्षांपासून अवकाळी पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होत असल्याने सोयाबीनचे दर चढे होते. यंदा सोयाबीन साडेसात हजार या उच्चांकी पातळीवर पोहोचले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीत झालेली घट व काही प्रमाणात उत्पादनात झालेल्या वाढीने सोयाबीनच्या दरात घसरण झाली असून दर सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर खाली आले आहेत. तसेच निर्यात शुल्क हटवल्याने कच्च्या मालाची उपलब्धताही वाढली. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारपेठेत १७० रुपये पाऊच व १५ लिटरचे दर दोन हजार ४५० होते. तेच या आठवड्यात अनुक्रमे १६५ रुपये व दोन हजार ४०० झाले आहेत.

साठेबाजांची नफेखोरी
तेलवर्गीय धान्याच्या दरात वाढ झाल्याबरोबर बाजारात तेलाच्या दरात संभाव्य तुटवडा जाणवेल, म्हणून भाव वाढ केली जाते. आता सोयाबीनच्या दरात प्रति क्विंटल १५०० रुपयांची घसरण होऊन पंधरवडा उलटला तरी तेलाच्या दरात केवळ पाच रुपयांचीच घसरण झाली. त्यामुळे यामागे साठेबाजांची नफेखोरी मानली जाते.

बातम्या आणखी आहेत...