आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवक:सोयाबीनला लातूरपेक्षा अधिक दर; तुळजापुरात दिवसात एक हजार क्विंटलची आवक

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर बाजार समितीत सोयाबीनला लातूर मार्केट पेक्षा ८० रूपये अधिकचा दर मिळाला आहे. बाजार समितीत बुधवारी सोयाबीनचा ५२५० रूपये प्रती क्विंटल दर जाहीर करण्यात आला. हा दर जिल्ह्यात सर्वाधिक आहे. लातूर येथील बाजारपेठेत ५१७० रूपये प्रती क्विंटल दर आहे. दरम्यान, बुधवारी तुळजाूर बाजार समितीत विक्रमी एक हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली.

बाजार समितीत उपलब्ध सुविधांमुळे व्यावसायिकांची संख्या वाढली अाहे. यामुळे कृषी मालाला चांगला दर मिळत आहे. परिणामी गेल्या काही वर्षात तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक वाढली आहे. दरम्यान सोयाबीनला सर्वाधिक दर मिळाल्याने आगामी दिवसात सोयाबीनची आवक वाढणार आहे. तसेच सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी बाजार समितीत आपला शेतीमाल घालण्याचे आवाहन बाजार समितीचे सचिव उमेश भोपळे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...