आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:सोयाबीनची गंज जाळली, दीड लाखाचे नुकसान ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

तेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून शेतात गंज लावून ठेवली होती. या सोयाबीनच्या गंजीस तीन जणांनी आग लावून जाळून टाकल्याच्या आरोपावरून तीन जणांविरूध्द ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार रामवाडी येथे मंगल किसन कदम यांची गट नंबर १५६ मध्ये वहिवाटीची शेतजमीन आहे. या ठिकाणी सोयाबीनची पेरणी केली होती. त्या पिकांची ३० ऑक्टोबर रोजी काढणी करुन शेतात गंज लावून ठेवली होती. ३१ ऑक्टोबर रोजी रामवाडी येथील उज्ज्वला किरण गाढवे व प्रतीक किरण गाढवे यांनी शिविगाळ करून अडथळा निर्माण केला. तसेच किरण रंगनाथ गाढवे यांच्या चिथावणीवरूनच प्रतीक गाढवे यांनी सोयाबीनच्या गंजीस आग लावली. लागलेल्या आगीमुळे एक लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. तशी तक्रार मंगल यांनी ढोकी पोलिस ठाण्यात दिली. त्या वरुन पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...