आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी; खरीप सोयाबीन बियाणे पेरणीबाबत आवाहन

उस्मानाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगामाकरिता सोयाबीन बियाणे पेरणीबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी आवाहन केले आहे की, ७५ ते १०० मि. मी. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. प्रती हेक्टरी बियाणे दर ७५ किलोवरून ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लॅटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता ७० टक्के पेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. पेरणीपुर्वी प्रती किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम आणि पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रती १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे आणि नंतर त्याची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत करावे.

शेतक-यांनी खरीप २०२२ मध्ये पेरणीसाठी स्वत:कडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे पेरणीसाठी वापरावे, पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी, चांगली ओल म्हणजे ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...