आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईला गती:वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाईला गती

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीचे नियम माेडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याला खो बसत होता. मात्र, गुरूवारपासून पोलिस विभागाकडून याला पुन्हा गती देण्यात आली आहे. गुरूवारी एकाच दिवसात तब्बल ३२९ वाहनांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. बुधवारीही १९५ कारवाया करण्यात आल्या होत्या.

शहरातील वाहतुक शाखा तसेच जिल्ह्यातील विविध १६ पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून दररोज बेलगाम सुटणाऱ्या वाहनधारकांवर कारवाया करण्यात येत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून केवळ काही वाहनांवरच कारवाया करण्यात येत होत्या. मात्र, मागील दोन दिवसांपासून या कारवायांना वेग देण्यात येत आहे. उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलिस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर गुरूवारी मोटार वाहन कायदा नियम भंग प्रकरणी एकुण ३२९ कारवाया करुन दोन लाख १४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...