आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान:तुळजापुरात रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद; 40 जणांनी केले रक्तदान

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रारंभी उद्योजक प्रशांत अपराध यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहित चव्हाण, धैर्यशील कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराला धनंजय पाटील, धैर्यशील पाटील, अमर चोपदार, दुर्गेस साळुंके, रोहित चव्हाण, ॲड. जनक पाटील, बाळासाहेब चीखलकर आदींनी शिबिरास भेट दिली. शिबिराच्या यशस्वितेसाठी गणेश नन्नवरे, ओम जगदाळे, विराज जगदाळे, विजय नन्नवरे आदींनी पुढाकार घेतला.

बातम्या आणखी आहेत...