आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्स्फूर्त प्रतिसाद:लोहारा येथील दांडिया महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

लोहारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सप्तशृंगी दांडिया ग्रुपच्या वतीने रविवारी (दि. २) शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या दांडिया महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या वेळी ‘सुंदर मी आणि माझी दांडिया, ग्रुप दांडिया, संगीत खुर्ची, वैयक्तिक दांडिया आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यात जवळपास ३०० महिला व मुलींनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी आकांशा चौगुले, ज्योती चौगुले, नगराध्यक्षा वैशाली खराडे, पाणीपुरवठा सभापती मयुरी बिराजदार, नगरसेविका संगीता पाटील, आरती कोरे, आरती गिरी, नाजमीन शेख, मीरा फुलसुंदर, योगिता वचने यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली रसाळ व बालाजी मक्तेदार यांनी केले. प्रास्ताविक अमित बोराळे यांनी केले. सुंदर मी आणि माझी दांडिया या स्पर्धेत डॉ. रूपाली श्रीगिरे यांनी प्रथम, प्रणाली वाकळे यांनी द्वितीय तर अंजली पटवारी यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

महिला ग्रुप दांडिया स्पर्धेत स्वामी समर्थ ग्रुपने प्रथम तर शांभवी दांडिया ग्रुपने द्वितीय क्रमांक पटकावला. वैयक्तिक दांडिया (महिला) स्पर्धेत मयुरी बिराजदार यांनी प्रथम, आरती नरुणे द्वितीय तर सरोजा गायकवाड यांनी तृतीय क्रमांक पटकावला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सप्तशृंगी दांडिया ग्रुपच्या ललिता कांबळे, ज्योत्स्ना रोडगे, भाग्यश्री कुंभार, सविता जाधव, मनीषा राठोड, आकांक्षा कांबळे, मार्गदर्शक अमित बोराळे व बालाजी मक्तेदार यांनी परिश्रम घेतले. सविता जाधव यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...