आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देण्यासह क्रीडा जगतात एक वेगळे वलय प्रस्थापित करण्यासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जेदार खेळाडू उस्मानाबाद जिल्ह्यात घडले आहे. त्यामुळे उस्मानाबादेत भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची मागणी जिल्ह्यातील विविध एकविध क्रीडा संघटनेच्या वतीने भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्याकडे केली. दिलेल्या निवेदनात म्हटले की, मागासलेला ओळख असलेल्या जिल्ह्यास खेळाडूंनी एक वेगळी ओळख करून दिली.
कसल्याही सोई-सुविधेविना राज्य, राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील मैदानही दणाणून सोडले. उस्मानाबाद जिल्ह्याचे वातावरण खेळासाठी अतिशय चांगले असून साई मार्फत स्पर्धा पूर्व प्रशिक्षणाची व्यवस्था करणे शक्य होईल. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे नवे केंद्र उस्मानाबादेत उभारल्यास जिल्ह्याच्या विकासात भर पडून मागासलेपणा दूर होईल.
यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, भाजप, ज्युदो व सायकलिंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा धनुर्विद्या व ज्युदो संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, जिल्हा खो खो संघटनेचे सचिव प्रवीण बागल व इतर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.