आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:क्रीडा शिक्षक रवींद्र अलसेट यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जवाहर नवोदय विद्यालयातील क्रीडा शिक्षक रवींद्र अलसेट यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करून निरोप देण्यात आला. अलसेट यांनी ३० वर्षे सेवा केली. या कार्यकाळात त्यांनी शेकडो विद्यार्थी, खेळाडूंना घडवले आहे.

येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांच्या हस्ते रवींद्र अलसेट यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संविधान भालेराव, वैष्णवी कुदळे या विद्यार्थ्यांनी तसेच सुजाता कराड, रामकुमार शुक्ला, एन. पी. पवार या सहकारी शिक्षकांनी अलसेट यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे केली.

विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांच्या कार्याचे कौतुक केले. आभार एस. एच. गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एच. जी. जाधव, सी. एस. गोमारे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाला विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...